महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्कृत विषयाचे प्रा. प्रसाद जालनापुरकर यांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना आंबेडकरांचे सामाजिक समता, बंधुता आणि संविधान मूल्यांचे महत्व विशद केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, दिनविशेष समितीचे प्रा. डॉ. एम. एस. खांडेकर तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!