महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत संताजी जगनाडे जयंतीनिमित्त अभिवादन

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संत संताजी जगनाडे जयंतीनिमित्त अभिवादन

उदगीर (एल पी उगिले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे संत परंपरेतील अद्वितीय कीर्ती लाभलेले, भक्ती चळवळीचे अग्रणी संत संताजी जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर आणि अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार यांनी संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमात समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. एस. व्ही. भद्रशेट्टे यांनी संतांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रखर समाजभक्ती, कीर्तन परंपरा आणि समता-भक्तीच्या मूल्यांची उपस्थितांना प्रेरणादायी माहिती दिली. त्यांनी संताजींच्या ओव्या, त्यांच्या समाज जागृतीतील योगदान आणि भक्तिमार्गातील नि:स्वार्थी सेवाभावाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, ग्रंथपाल डॉ. एल. बी. पेन्सलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, दिनविशेष समितीचे प्रा. डॉ. एम. एस. खांडेकर तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!