उदयगिरी अकॅडमीच्या 2026 च्या दिनदर्शिकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन

0
उदयगिरी अकॅडमीच्या 2026 च्या दिनदर्शिकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन

उदगीर (एल पी उगिले) उदगीर येथील नामांकीत उदयगिरी अकॅडमीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अत्यंत उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे शालेय प्रथम सत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. दिनदर्शिका विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. सदरील कार्यक्रमात उदयगिरी अकॅडमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व विद्यार्थ्यांना दिनदर्शिका वाटप करण्यात आल्या.
दिनदर्शिकेचे प्रकाशन हा उदयगिरी अकॅडमीचा वार्षिक उत्सव आहे, आणि तो प्रत्येक वर्षी तेवढ्याच थाटामाटात संपन्न होतो. विद्यार्थ्यांमध्ये वार्षिक अभ्यासाचे नियोजन लावण्याची सवय व वक्तशीरपणा या सवयी रूजाव्यात आणि उदयगिरी अकॅडमीच्या वतीने आमच्या सर्व पालकांना एक छोटीशी वार्षिक भेट घरपोच मिळावी. हे या उपक्रमामागचे उद्देश आहेत, असे मत उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी यावेळी प्रस्तावनेत बोलत असताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रा. संतोष पाटील, प्रा. धनंजय पाटील, प्रा. श्रीगण वंगवाड रेड्डी, प्रा.सौ. ज्योती खिंडे, प्रा. सौ. नंदिनी निटूरे, प्रा. सौ. निवेदिता भंडारे, प्रा. गोविंद केंद्रे इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!