व्यक्तिगत जीवन उंचावण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक- प्रमोदजी कुलकर्णी

0
व्यक्तिगत जीवन उंचावण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक- प्रमोदजी कुलकर्णी
 उदगीर (एल.पी.उगीले) व्यक्तिगत जीवन उंचावण्यासाठी योग साधनेतील नियम नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे विचार प्रमोद कुलकर्णी यांनी मांडले. ते येथील पतंजली योग परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योग संवाद व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंफताना बोलत होते. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, योग साधना मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील नियम या दुसऱ्या अंगाची सविस्तर अशी अभ्यास पूर्ण माहिती सर्व उपस्थिताना दिली.
पूज्य तपस्वी कुमार स्वामीजी प्रार्थना मंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमां मध्ये साधारणतः 40 योगप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रा.नरेंद्रजी शिंदे यांनी केले. चौथ्या पुष्पाच्या वेळेस प्रमोद कुलकर्णी यांनी यम या पहिल्या अंगा बद्दलची सविस्तर माहिती दिलेली होती. पाचव्या पुष्पाची गुंफण करत असताना अष्टांग योगातील नियम या दुसऱ्या अंगाची माहिती अतिशय शिस्तबद्ध वेगवेगळ्या उपमा व दृष्टांतांच्या माध्यमातून करून दिली. पतंजली योग परिवाराच्या माध्यमातून सर्वांचे सामाजिक आरोग्य चांगले असावे, संपूर्ण समाज निरोगी व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्तीची मानसिक, भावनिक ,शारीरिक व सांस्कृतिक उन्नती चांगली असावी. प्रत्येक व्यक्तीचं सामाजीकरण चांगल्या रीतीने व्हावे, या भावनेपोटी हा उपक्रम पतंजली परिवाराच्या विद्यमाने राबविला जात आहे. रामदेव बाबांच्या स्वप्नातील निरोगी भारत, निरोगी समाज बनवण्याचा पतंजली परिवाराचा मानस आहे. उदगीर मध्ये जवळपास 22 योग वर्ग चालू आहेत. कितीही संख्या जरी आली तरी परिवारातील योग शिक्षक आपला वर्ग बारा महिने चालू ठेवतात, जेणेकरून योगसाधकांना त्यांच्या आरोग्याबद्दल लाभ घेता यावा, हा या मागचा उद्देश आहे. एकंदरीत योग विषयक जाणीवा समृद्ध व्हाव्यात, आपल्या आरोग्या बद्दल सर्वांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, योग केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये काय बदल होतो ? आपल्या ज्ञानामध्ये कशी भर पडते? याबद्दल जनमानसात जागृती व्हावी, व प्राचीन सनातन भारतीय संस्कृतीतील ही योग परंपरा अबाधितपणे सर्वांना उपयोगाची ठरावी, आणि अशीच ही योग परंपरा आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करावी. हा यामागचा हेतू आहे. मुळात योग विषयासारखा गहन विषय सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेरचा असतो त्यामुळे हा विषय सुलभ व्हावा ,सोपा व्हावा, प्रत्येकाच्या मनामध्ये योग विषयक आवड निर्माण व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. महर्षी पतंजलीनी सांगितलेल्या योग परंपरेतील अष्टांग योगाची अष्टांग अंगाची, उपांगाची ओळख सर्वच समाजाला व्हावी. असा उद्दात हेतू मनाशी बाळगून पतंजली परिवाराने या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेल आहे. या योग संवाद व्याख्यानमालेसाठी उमाकांत अंबेसंगे , शिवकुमार जी शिरगिरे, नरेंद्रजी यंदे, प्रा डॉ नरेंद्र शिंदे, मीनाक्षीताई स्वामी, सुमती भातांबरे, अशोकराव पाटील, प्रा श्रीराम चामले व योग परिवारातील सर्वच सदस्यांचा मोलांचा सहभाग या ठिकाणी लाभत आहे. सर्वच योग साधकांच्या विद्यमाने हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने चालत आहे. भलेही संख्या 40 च्या आत असली तरीही येणारे सर्व साधक जवळपास एक तास या योगाच्या ज्ञानयज्ञांमध्ये उपस्थित होत आहेत.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर्वांच्या सहकार्याने चालणाऱ्या या योग संवाद कार्यक्रमास अधिकाधिक सुज्ञ,जिज्ञासू, अभ्यासू व्यक्तींनी यावे हीच अपेक्षा. या ठिकाणी पतंजली योग परिवाराच्या माध्यमातून केली जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक डॉ.प्रा.नरेंद्र शिंदे यांनी केले. अध्यक्ष समारोप बाबुरावजी माशाळकर यांनी तर आभार प्रदर्शन उमाकांत आंबेसंगे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!