समीक्षा लेखन स्पर्धेत किशन उगले यांचे यश

0
समीक्षा लेखन स्पर्धेत किशन उगले यांचे यश

उदगीर (प्रतिनिधी) : ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा च्या निमित्ताने आम्ही पुस्तक प्रेमी या राज्यस्तरीय साहित्य मंडळाच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर समिक्षा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय समिक्षा लेखन स्पर्धेत व्यंकटराव देशमुख विद्यालय बनशेळकी ता. उदगीर येथील शिक्षक व समिक्षक श्री. किशन दत्तात्रय उगले शेकापूरकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. त्याबद्दल दि.२१ डिसेंबर २०२५ या दिवशी सातारा येथे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिव राजेंद्र सिंह यांच्या हस्ते व संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत कोषाध्यक्ष चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष दिल्ली येथील साहित्य मंडळाचे अध्यक्ष रंगनाथन देशपांडे यांच्या उपस्थितीत रोख रक्कम स्मृती चिन्ह सन्मान पत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
किशन उगले शेकापूरकर यांना समिक्षा लेखन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्यातील मराठी साहित्यिक मंडळी सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!