राजकारणात संयम आणि सहनशिलता हे चाकुरकरांनी शिकविली : आ. संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगीले): राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व म्हणुन आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकुरकरांना ओळखले जाते. राजकीय जीवन जगत असताना नविन पिढीने संयम आणि सहनशिलतेची शिकवण आपल्याला चाकुरकरांनी शिकविली आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या नेतृत्वामुळे आपल्या लातुर जिल्ह्याचे नाव जगात पोहचले आहे. असे मत माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात आम्ही उदगीरकर यांच्या वतीने आयोजित भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्यामुळे आयोजीत केलेल्या शोकसभा प्रंसगी बोलत होते.
यावेळी आमदार संजय बनसोडे म्हणाले,शिवराजजी पाटील चाकूरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महत्वाची पदे भूषविलेले आहेत. त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल अशा अनेक महत्त्वांच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे. अतिशय शांत, संयमी, अभ्यासू, तत्वनिष्ठ आणि नैतिक नेतृत्वासाठी त्यांना संपूर्ण देशात ओळखले जाते.
शिवराजजी पाटील चाकूरकर यांनी देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले असुन जात-धर्म-भाषा-पक्ष या भिंतींच्या पलीकडे जावून त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आपले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे असे संबंध निर्माण केले होते.
देशाच्या वैज्ञानिक, इलेक्ट्रॉनिक, शेती विषयक, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात शिवराज पाटील चाकूरकर यांचे मोठे योगदान राहिले आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक अतिशय चांगली परंपरा निर्माण करून सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्रितपणे विकासाच्या राजकारणाची सुरुवात शिवराज पाटील चाकूरकर यांनीच केली. त्यामुळे त्यांचा आदर्श नव्याने राजकराणात आलेल्या पिढीनेही घेण्याची आवश्यकता आहे असेही सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बस्वराज पाटील नागराळकर, माजी आमदार मनोहर पटवारी, शिवराज तोंडचिरकर, राहुल केंद्रे, रमेश अंबरखाने, बस्वराज पाटील कौळखेडकर, उमेश पाटील, सुरेश पाटील नेत्रगावकर, उध्दव महाराज हैबतपूरे, सुखदेव अप्पा स्वामी, बालाजी भोसले, वसंत पाटील, उत्तराताई कलबुर्गे,अमोल अनकल्ले, अनिल मुदाळे, बालाजी गवारे, देवीदास कांबळे, शाम डावळे, शिवकुमार हासरगुंडे, सचिन हुडे, शशिकांत बनसोडे, मनोज पुदाले, प्रशांत मांगुळकर, दत्ता पाटील, प्राचार्य डॉ. ए.ए. काळगापूरे, डॉ. सुनीता लोहोरे, फय्याज शेख, डॉ. गोविंद सोनकांबळे, व्यंकट बोईनवाड, अँड व्ही. एम. औरादे, गोपाळकृष्ण घोडके, संदीप पाटील, बस्वराज पाटील मलकापूरकर, एस. एस. पाटील, प्रभाकर काळे, मंजुरखाँ पठाण, बन्सीलाल कांबळे, लक्ष्मण सोनवळे, महेश बसपुरे, जवाहरलाल कांबळे, मुकेश भालेराव, रोहिदास कुंडगीर, राजकुमार चव्हाण, शुभम केंद्रे, मेहबुब शेख, सोनू हाशमी, आझम पटेल, विक्रम हालकीकर आदींची उपस्थिती होती.
