इथिओपिया हा शांतताप्रिय देश – बाबासाहेब चव्हाण

0
इथिओपिया हा शांतताप्रिय देश - बाबासाहेब चव्हाण

उदगीर (प्रतिनिधी) इथोपिया हा दक्षिण आफ्रिका खंडात असून या देशात सांसदिय लोकशाही आहे. हा देश आर्थिक दृष्ट्या विकसनशिल देश असून इथिओपियात ६० टक्के खिश्चन धर्मीय व ४० टक्के मुस्लीम व अन्य धर्माचे लोक राहतात . मात्र धार्मिक द्वेष नसल्यामुळे धार्मिक सण उत्सव एकोप्याने साजरे
होतात. असे प्रतिपादन इथिओपियातील ओके प्लास्टीकचे प्लँट मॅनेजर इंजि तथा नाशिकचे रहिवाशी बाबासाहेब चव्हाण यांनी केले. ते इथिओपिया आणि तेथील लोकजीवन’ ह्या विषयावर जिव्हाळा ग्रुपतर्फे आयोजित व्याख्यानात बोलत होते.
सदरील कार्यक्रमात डॉ रमेश बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली, जिव्हाळा ग्रुपचे समन्वयक तथा माफसू नागपूरचे माजी संचालक शिक्षण विस्तार डॉ अनिल भिकाने, सचिव डॉ अशोक दारनुळे, देविदासराव नादरगे, शंकरराव साबणे यांचे उपस्थितीत बाबासाहेब चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. ते पुढे म्हणाले, कृषी हा इथिओपियाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ७०-७५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून असून टेफ चा प्रमुख अन्नधान्य पीकामध्ये समावेश होतो. इथिओपिया कडे आफ्रिकेतील सर्वात मोठी पशुधन संपदा असून दुधासाठी गोपालन केले जाते. प्रमुख खाद्यपदार्थात इंजेरा , वाट ,शिरो , दुध , दही, मांस यांचा समावेश होतो देशाच्या काही भागात अन्न टंचाई व कुपोषण आढळून येते. कॉफी मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथ मूडपे यांनी केले. सूत्रसंचालन साहित्यिक रमाकांत बनशेळकीर कीकर यांनी केलेतर डॉ अशोक दारनुळे यानी आभार प्रदर्शन केले.
याच कार्यक्रमात सातारा येथे संपन्न होणाऱ्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा ठराव पास करून त्यांनी उदगीर ते पानिपत पर्यन्त काढलेल्या पदयात्रेचे स्मरणही करण्यात आले.तसेच गुरुकृपा हॉटेलचे मालक संजय कानगुले यांचा सत्कार ही करण्यात आला. कार्यक्रमास सौ अरुणा भिकाने , सौ माधुरीताई चव्हाण,विठ्ठलराव फुलसे, प्रा दिपक पाटील अमृतराव देशपांडे, सच्चीदानंद पुठ्ठेवाड, शरणप्पा खेळगे, दिलीप कंधारे, मनोहर खिंडीवाले, हरिश्चंद्र वट्टमवार, चंद्रकांत रोडगे ,बाबुराव वाघमारे, रामराव मोमले, वैजनाथराव पंचगल्ले, उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!