नागझरी येथे १० वी उत्तीर्ण गुणवंत विधार्थांचा ग्रामपंचायत कार्यालया तर्फे सत्कार

नागझरी येथे १० वी उत्तीर्ण गुणवंत विधार्थांचा ग्रामपंचायत कार्यालया तर्फे सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नुकताच १० वर्गातील उत्तीर्ण गुणवंत १७ विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने इयत्ता १० वी वर्गातील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे प्रथम नागरिक सरपंच रामकिशन सूर्यवंशी होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपसरपंच उद्धव इप्पर म्हणाले की, इयत्ता १० वी म्हणजे यशाची पहिली पायरी आहे. आज पासून ठरवा कि आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे, मेडिकल, इंजिनीरिंग, स्पर्धा परीक्षा कोणते पण क्षेत्र निवडा मेहनत केले तर नक्कीच यश मिळते सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक मित्रा बरोबर राहू नका, व्यायाम करा, कोणतीच नशा करू नका. मेहनत केल्यावर नक्कीच यश मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही अगोदर माणूस बना कारण साध्या लोकसंख्या भरपूर आहे पण माणसे कमी झाले आहेत. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे आपला पाल्या नशा करू नये वाटत असेल तर अगोदर पालकांनी नशा करू नये. १५-२५ हे वय स्वतःचे करियर घडवण्याचे आहे आपण जर चांगल्या दिशेने गेलात तर नक्कीच यश मिळेल आणि जर चुकीचे दिशेने गेलात तर हे वय खुप अवघड आहे. आपल्या गावातून खुप जण चांगल्या पदावर आहेत पुढच्या काळात तुम्ही पण चांगल्या पदावर जाल हीच अपेक्षा ग्रामपंचायत तर्फे तुम्हाला जि मदत पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू असे शेवटी आपल्या मनोगतात म्हणाले. यावेळी व्यंकट इप्पर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कि आज चा तरुण नशेच्या आहारी जात आहे आपल्या गावात आज मंचक इप्पर यांची आय.ए.एस अधिकारी म्हणुन एक लाल दिव्याची गाडी येत आहे भविष्यात अश्या खुप गाड्या आपल्या गावात येतील अशी मला अशा आहे असे मनोगत व्यक्त केले. माजी मुख्याध्यापक बालाजी इप्पर म्हणाले कि कोरोना मुले जरी तुमच्या परिक्षा झाल्या नसल्या तरी पुढे १२ वी ला चांगली मेहनत करा चांगले क्षेत्र निवडा, जेवढ्या गोष्टी उपसरपंच यांनी सांगितल्या त्याच्या १०% जरी केलात तरी तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुंडगीर यांनी केले. आभार श्याम सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमासाठी चेअरमन नागनाथ इप्पर, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी बाई इप्पर, रुक्मिणी मुंढे, नागनाथ अलापुरे, शिवराज इप्पर, शिवराम उगीले, अंकुश इप्पर, अंकुश अलापुरे, बालाजी नागरगोजे, चंद्रकांत इप्पर, संजय इप्पर तसेच सर्व गावकरी मंडळी व विधार्थी उपस्थित होते.
यावेळी खालील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

  1. इप्पर अश्मीता राजकुमार 96%.
  2. अजिंक्य ज्ञानोबा इप्पर 91.60
  3. सृष्टी सुनील इप्प र 91 %
  4. वाघमारे साक्षी ज्ञानेश्वर 86.40
  5. सुर्यवंशी ज्ञानेश्वरी बळीरा 82.60%
  6. सुर्यवंशी मुक्ता व्यंकटी 74.00%
  7. इप्पर गोविंद संजय 71.60
  8. इप्पर ओम कोंडिबा। 71.40 %
  9. मुंडे दत्ता सावंत 70.60 %
    10.धीरज नागनाथ इप्पर 68.60%
  10. इप्पर अनिकेत पंढरी 68.00%
  11. इप्पर द्रोपदी व्यंकटी 68.40%
  12. वाघमारे ऐश्र्वर्य वैजनाथ 66.00
  13. सुर्यवंशी विशाल भानुदास 63.60%
  14. इप्पर माधव शिवाजी 60.40%
  15. उगीले राम दिलीप। 56.20 %
    17 इप्पर वैष्णवी पद्माकर 72.80%
    कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गावातील तरुण वर्ग व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author