अहमदपूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

0
अहमदपूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; फॉर्च्युनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर( गोविंद काळे)अहमदपूर-नांदेड महामार्गावरील क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या पाटीजवळ रविवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास एका भरधाव कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. लातूरकडून अहमदपूरच्या दिशेने येत असलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने (क्र. MH 13 ES 5657) समोरील मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विठ्ठल पंजाबराव नाईक (वय ३५ वर्षे, रा. सानपाडा, नवी मुंबई, मूळ रा. भिरडा, जि. हिंगोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विष्णू व्ही. के. हे गंभीर जखमी झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल नाईक हे त्यांच्या मोटारसायकलवरून (क्र. MH 43 CD 4894) क्राइस्ट स्कूलच्या रोडवरून हायवेमार्गे अहमदपूर शहराकडे येत होते. याच दरम्यान समोरून येणाऱ्या फॉर्च्युनर कारच्या चालकाने आपले वाहन अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून विठ्ठल यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बिट अंमलदार साळवे आणि पोलीस कर्मचारी जायभाये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले. अपघातानंतर कार चालक आपले वाहन घटनास्थळावरच सोडून पसार झाला आहे.

​या घटनेबाबत मयताचे वडील पंजाबराव नारायणराव नाईक (वय ७५ वर्षे, व्यवसाय वकील) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (A) (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!