मातृभूमीच्या वतीने महिला नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार.

0
मातृभूमीच्या वतीने महिला नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार.

उदगीर (एल पी उगिले) येथील मातृभूमी महाविद्यालय व मातृभूमी महिला प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. स्वाती सचिन हुडे व महिला नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्राचार्य उषा कुलकर्णी या होत्या. तर मंचावर नगराध्यक्ष सौ. स्वाती हुडे, तसेच नगरसेविका मंजुश्री बनसोडे, मनकर्णा मुदाळे, संध्या गांजुरे, विद्या बुंदे, ॲड. वर्षा कांबळे, अंजली पस्तापुरे, मुर्झा रेश्मा, भरती भोसले, निकिता अंबरखाने, गोकर्णा गायकवाड, सना कासार डॉ कुरेशी, शीतल शिंदे, भागीरथी महापुरे, मीना कोठारे आदी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
नगराध्यक्ष स्वातीताई हुडे यावेळी बोलताना म्हणाल्या की, कष्टातून मिळवलेले यश चिरकाल टिकणारे असते. त्यामुळे जीवनात “जितना बडा संघर्ष उतनीही शानदार जीत” संघर्षाशिवाय जीवनात काही मिळत नाही. शॉर्टकट हा क्षणभंगुर असतो आणि मिळवलेले यशाची उंची शॉर्टकट मुळे टिकत नाही, तसेच आपल्या मातृभूमीचे काहीतरी देणे असतेच त्यामुळे विद्यार्थ्यांनी माता आणि मातृभूमीचा सन्मान सातत्याने राखलाच पाहिजे.
प्राचार्य उषा कुलकर्णी म्हणाल्या की, आज महिलांच्या हाती शहराची सूत्रे आहेत, हीच महिला सबलीकरणाची मोठी पावती आहे. नगराध्यक्षांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी अनेक पावले उचलली जातील अशी आम्हाला आशा आहे: शहरातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याला प्राधान्य मिळेल.,
महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल.,
आरोग्य शिबिरे आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे महिलांना मुख्य प्रवाहात आणले जाईल.,जेव्हा एक महिला नेतृत्व करते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज पुढे जातो, हा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल याची मला खात्री आहे. एक महिला नेतृत्व जेव्हा सत्तेवर येते, तेव्हा सामान्य महिलांच्या अपेक्षा उंचावतात.,महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंसहायता गटांना बळ देणे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ जाळे विणणे. अशा महत्त्वाच्या सूचना केल्या.
यावेळी मातृभूमी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी, जाई शर्मा, शुभांगी वाट्टमवार, ओंकारे जगदीशा, आश्विनी काळे, मीरा पाटील, उषा सताळकर, नेहा वाघमारे, प्रतीक्षा काकरे, गोल्डन गेट शाळेचे प्राचार्या वनिता सुगंधी, अर्चना मठपती, निलांबिका पांचाळ, लक्षमी वल्लपवाड, अलविरा शेख, मातृभूमी महिला प्रतिष्ठानच्या डॉ प्रियांका राठोड,नीता मोरे, पूजा टाके,आश्विनी निवर्गी, मीना चामले, आश्विनी कुलकर्णी, भाग्यश्री पाटील, अवपर्णा स्वामी, वर्षा कानडे, शिल्पा म्हेत्रे, प्रभा होलसंब्रे,संगीता पाटील, गीता उल्लेवाड, गीता जिरोबे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वाती भांगे यांनी केले तर आभार जाइ शर्मा यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!