ग्राहक पंचायत रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण

0
ग्राहक पंचायत रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खंडाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण

रत्नागिरी (प्रतिनिधी) ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट ज्युनिअर कॉलेज मध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. ग्राहक पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम आलेल्या तन्वी दिपक सावंत (11 वी सायन्स) द्वितीय पुर्वा प्रकाश बारगुडे (11 वी विज्ञान ) व तृतीय आलेल्या तनुजा लक्ष्मण पातये (11 वी विज्ञान ) या विद्यार्थीनीना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच प्रशालेचे प्राचार्य शिवाजी जगताप यांचाही शाळेच्या उत्तम सहभागाबद्दल सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंधुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रम घेतल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही क्षेत्रात जर कोणावर अन्याय झाला, लुबाडणुक झाली किंवा फसगत झाली तर संबंधिताने रितसर तक्रार करावी, दाद मागावी. ग्राहकाने आमच्याशी संपर्क साधला तर निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक पंचायत वचनबद्ध आहे. सर्वानी सजग व जागृत राहण्याची खुप गरज आहे. ग्राहक पंचायतीकडे आतापर्यंत तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. असेही सावंत म्हणाले. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोरच सतत जागृत असले पाहिजे, चौकस असले पाहिजे.अन्याय करणा-या पेक्षा, अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. अन्यायाविरूद्ध योग्य त्या ठिकाणी दाद मागायला हवी.स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा विद्यार्थी यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंद यांच्या सकारात्मक उर्जात्मक विचारांची आजही देशाला नितांत गरज आहे. असे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडेचे मुख्याधापक विलासराव कोळेकर यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सचीव आशिष भालेकर, जिल्हा कोषाध्यक्ष दिपक साळवी, पत्रकार उदय महाकाळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन जंगम यांनी केले. यावेळी सरगर, मुसळे हेही उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!