लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांचा शिवसेनेत प्रवेश

0
लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांचा शिवसेनेत प्रवेश

लातूर : (एल पी उगिले) येथील सामाजिक कार्यकर्ते पूर्व आश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पत्रकार तथा समाजसेवक लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षप्रवेश केला आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा व्यंकटराव पनाळे यांच्या गळ्यात घालून शिवसेनेतील प्रवेशाचे स्वागत केले आहे.
तसेच लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचाही शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा घालून शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला.
यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख रवींद्र गुरमे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, उदगीर चे माजी आमदार सुधाकरराव भालेराव, संतोष पनाळे, महेश चव्हाण, उल्हास सूर्यवंशी, शिवचरण पाटील, बाबुराव आंबेगावे, संजय बिराजदार, गहिनीनाथ राजे त्याचबरोबर अनेक मान्यवर व विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचेच शिवसेना सचिव संजय मोरे यांनी शिवसेनेचा भगवा घालून शिवसेनेत प्रवेश देऊन स्वागत केले.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येवर एक स्पष्ट वक्ता आणि अभ्यासू नेता शिवसेनेला मिळाल्यामुळे शिवसेनेचे बळ निश्चितच वाढले आहे. अशी प्रतिक्रिया राजकारणी लोकांमध्ये सुरू झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!