अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर; ऑनलाईन सेंटर चालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

0
अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर; ऑनलाईन सेंटर चालकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल

​अहमदपूर (गोविंद काळे):तहसीलदार अहमदपूर यांच्या बनावट सह्या, बनावट शिक्के आणि खोटे आदेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार अहमदपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार अभिलाष महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून हा बनावटगिरीचा डाव रचला. अहमदपूर नगरपरिषद क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांच्या अधिकारातील आदेशांची आवश्यकता असते. आरोपींनी या अधिकाराचा गैरवापर करत तहसीलदारांची हुबेहूब बनावट सही आणि कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले. या आधारे त्यांनी जन्म-मृत्यू नोंदी घेण्याचे खोटे आदेश तयार करून शासनाची आणि प्रशासनाची मोठी फसवणूक केली. तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल ३११ बनावट दस्तऐवज उघडकीस आले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली

१) शेख अफरोज (पॉप्युलर झेरॉक्स, अहमदपूर)

२) निसार खुरेशी (रा. अहमदपूर)

३) फसाहत मिर (अली ऑनलाईन सेंटर, अहमदपूर)

४) गौस मनियार (रा. अहमदपूर)

५) बिलाल मौलाना (रा. अहमदपूर)

६) मतिन शेख (नॅशनल ऑनलाईन, अहमदपूर)

​यांच्यावर अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कलम ३१८(४), ३४०(२), ३३६(३) आणि ३(५) BNS अन्वये गुन्हा (रजि. नं. ८३७/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

​दोषींवर कठोर कारवाई होणार : तहसीलदार उज्वला पांगरकर

​”तहसीलदार कार्यालयाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षरी वापरून ३११ बनावट दस्तऐवज तयार केल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार दिली असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत केंद्रांवरूनच आपले काम करून घ्यावे.”

— उज्वला पांगरकर (तहसीलदार, अहमदपूर)

​या प्रकरणाचा पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार हे करत आहेत. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि आतापर्यंत किती बनावट दस्तऐवज याद्वारे वितरीत करण्यात आले, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या ऑनलाईन सेंटर चालकांचे धाबे दणाणले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!