रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, शिराळा ग्रामस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
लातूर (प्रतिनिधी) : गेली दहा दिवस झाले रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, लातूर व शिराळा ता. जि. लातूर येथील ग्रामस्ताच्या वतीने प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने अहोरात्र मेहनत घेऊन, महापुरात अडकलेल्या बांधवांना आधार देण्यासाठी, त्यांना परत उभं करण्यासाठी आर्थिक निधी, वस्तू, अन्नधान्य अशा वेगवेगळ्या स्वरूपाची मदत जमा करण्यात आली.
ग्रामस्थांनी मदत जमा करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिराळा या ठिकाणी प्रतिष्ठानचे लातूर जिल्हा समन्वयक राहुल मोहिते-पाटील व ग्रामस्त यांच्या वतीने महाराजांना पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून प्रतिष्ठानचे राज्यसंघटक ज्ञानेश्वर काळे यांच्याकडे सुपूर्द करून ती रविवारी सांगली, सातारा, कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.
यावेळी लातूर जिल्हा प्रवक्ते कल्याण देशमुख, प्रतिष्ठानचे सदस्य उमाकांत साळुके,खंडू पवार, ज्ञानेश्वर काळे, श्रीकांत देशमुख, राहुल गव्हाणे, छत्रगुन काळे, श्रीकांत काळे, विष्णु देशमुख, विनोद काळे, हिम्मत गव्हाणे, लक्ष्मण इंगळे, लक्ष्मण आतकरे, धनंजय जाधव, संदीपान काळे, दादा काळे आणि शिराळा येथील प्रतिष्ठित नागरिकांनी ही मदत जमा करण्यासठी परिश्रम घेतले. शिराळा ग्रामस्थांनी केलेल्या मदतीचे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनी ताई महांगडे व कार्याध्यक्ष निलेश जगदाळे यांनी कौतुक केले.