हजारो रुपय खर्च करूनी पेरीले वाण, पावसाअभावी करपुनी जातय रान
पंधरा दिवसांपासून पावसाची दडी; शेतकर्याचा कपालावर चिंतेची आडी.
तोंडार (प्रतिनिधी) : शेतकर्याचा नशिबी कधी ओला दुष्काळ तर कधी करडा हे त्याचा पाचविला पुजंले असे म्हंटल्यावर काही हरकत नाही, कारण प्रतेक वर्षी कोणते ना कोणते संकट शेतकर्याचा डोळ्यासमोर उभ असतेच तीच परिस्थिती आज तोंडार महसूल मंडळातील शेतकर्यावर गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन, तूर ही पिके चक्क माना टाकुन दिल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळा सुरुवात होऊन दोन महिने उलटत आहेत, गत वर्षी पेक्षा यंदा चा मोसमी पाऊस वेळेवर झाल्याने शेतकर्यानी हजारो रुपये चे सोयाबीन चे बी खरेदी करून चाढयावर मुठ धरले, त्याच काळात पिकाचा वाढीपुरता पाऊस होत गेल्याने सर्व खरिप पिकाचा माना उंचावले होते, त्या मुळे शेतकरी समाधान व्यक्त करत होता, व मधोमध तर जुलै महिन्यात तर तोंडार परिसरात पावसाने कहरच केला असल्याने अनेकाचा चवाल रानातील पिके ही पिवळी पडत होते, तर अनेकाचा शेतात तन वाढले होते, काही पिकावर आली पडत होती, मात्र अति पावसामुले शेतकर्याना शेतात जाने जिकीरीचे झाले होते, परंतु गत पंधरा दिवसा पासुन तोंडार परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील हजारो रुपय खर्च करून पेरलेले वाण, आज कडक उन्हामुळे करपुनी जातय रान! आजतागायत तोंडार महसूल विभागात जुन व जुलै महिण्यात सर्वाधिक पाऊस झाला, त्यामुले 30 वर्षाचा इतिहासात यंदा चा पावसाने उदगीर शहराची तारणहार म्हनुन समजल्या जाणाऱ्या बनशेलकी डॅम हा तोंडार येथुन वाहणाऱ्या मानमोडी नदीचा पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाल्याने उदगीरकराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे, व या मंडळात आजतागायत 402 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद महसूल मंडळातील तलाठी बाबासाहेब काबंले यानी माहीती दिली,तरी सध्यसथित खरिप पिकाचा जिवदाणासाठी तात्काल पावसाची गरज आहे, मात्र वरुणराजा पुन्हा शेतकर्यावरचा आनंद हिरावून घेतोय की काय असा प्रश्न शेतकर्याना पडला आहे, तरी क्रषी विभाग व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्यानी सध्यसथित वालुन चालेल्या पिकाची पाहणी करून नोंद घेतली तर भविष्यात शेतकर्याना हक्काचा विमा व शासकीय मदत मिलेल अशी आशा शेतकरी वर्गातून होत आहे.