श्री गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सव समिती तर्फे उदगीर शहरातील पत्रकारांचा सत्कार

0
श्री गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सव समिती तर्फे उदगीर शहरातील पत्रकारांचा सत्कार

उदगीर (एल पी उगिले) श्री गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सव व नुतन वर्षानिमित्य ष.ब्र.प.श्री.श्री.108 डाॅ शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामभाऊ मोतीपवळे, अंबादास अलमखाने, महेशकुमार मठपती, रविंद्र हसरगुंडे, नागनाथ गुट्टे, सुनिल हवा, संग्राम पवार, संदिप निडवदे, अशोक तोंडारे, संगम पटवारी, विक्रम हलकीकर,मनोहर लोहारे,श्रीधर शेवाळे, अरविंद पत्की ,बालाजी कसबे, अरुण उजेडकर,मंगेश सुर्यवंशी यांच्यासह अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ष.ब्र.प.श्री.श्री 108 डाँ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी पत्रकाराबद्दल गौरव उद्दगार काढून पत्रकारांच्या लेखनीचे कौतुक केले.याप्रसंगी सुत्रसंचलन व आभार विरभद्र स्वामी सताळकर यांनी केले.यावेळी असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!