“जगाच्या पाठीवर” हे सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब असलेलं आत्मचरित्र होय – डॉ. सुशील देवशेट्टे.

0
"जगाच्या पाठीवर" हे सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब असलेलं आत्मचरित्र होय - डॉ. सुशील देवशेट्टे.
  उदगीर (एल पी उगिले) कै. सुधीर फडके यांच्या आयुष्याच्या अगदी प्रारंभी पासून लहरी नियतीनं जी वणवण भटकंती करायला भाग पाडलं,  त्या भंडावून सोडणाऱ्या प्रवासात दैन्याचे दशावतार अनुभवत असताना केलेली संगीतसाधना याचं विलक्षण दर्शन घडवणारं आत्मचरित्र म्हणजे जगाच्या पाठीवर हे सुसंस्कारित मनाचं स्वच्छ प्रतिबिंब होय. असे मत डॉ. सुशील शीलाताई सुरेश देवशेट्टे यांनी व्यक्त केले.

गेल्या पंधरा वर्षापासून अखंडितपणे चालू असलेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या वाचक संवादचे ३५२ वे पुष्प नागोराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुशील शीलाताई सुरेश देवशेट्टे यांनी सुधीर फडके लिखित जगाच्या पाठीवर या आत्मचरित्रावर संवाद साधून गुंफले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, सुधीर फडके यांनी किर्लोस्कर’ मासिकातून आपल्या आत्मचरित्राचा काही भाग लिहून प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांच्या लहानपणीच्या व अगदी सुरुवातीच्या खडतर उमेदीच्या काळातील आठवणी लिहिल्या होत्या.
आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर, अनंत हालअपेष्टा सोसत, अडीअडचणींवर प्रयत्नपूर्वक मात करून,आजारपण -अपमान – कुचेष्टा वगैरेची यत्किंचितही तमा न बाळगता, त्यांनी तो ध्येययज्ञ यशस्वीपणे पूर्ण केला.
चित्रपटसृष्टीत संगीत -दिग्दर्शक व पार्श्वगायनाच्या क्षेत्रांत त्यांना मिळालेल यश, त्या सृष्टीतले इतरही भलेबुरे अनुभव, “गीतरामायणा’ च्या निर्मितीची आणि त्यानंतरच्या लोकप्रिय वाटचालीची कथा देखील या आत्मचरित्रात वाचवयास मिळते. यावेळी त्यांनी कांही गीते गाऊन दाखवली.
या संवादा नंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली.
अध्यक्षीय समारोपात माजी गट शिक्षणाधिकारी नागोराव भोसले यांनी संवादकाचे कौतुक करत म्हणाले की,
बाबूजींचं यश आणि त्यांची लोकप्रियता अनेकांना ठाऊक आहे. पण त्या यशामागे दडलेल अपयश आणि लोकप्रियतेमागची खडतर कलासाधना समजून घेण्यासाठी हे आत्मचरित्र वाचायलाच हवं.
शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या अत्यंत प्रभावी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजपाल पाटील यांनी केले, संवादकांचा परिचय संदीप चेलवे यांनी करून दिला. आभार शिवशंकर पाटील यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!