पशुप्रदर्शानाच्या वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार : आ.संजय बनसोडे

0
पशुप्रदर्शानाच्या वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार : आ.संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगिले) : जिल्हातील पशुप्रदर्शानासाठी निधी कमी पडत असल्याची जाणिव मला आहे. त्यामुळे निधी वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार असून पशुप्रर्दशनासाठी आमदार निधीही देणार आहे. शासन स्तरावर पशुप्रदर्शानाला लागणा-या वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली.
ते उदगीर शहरात आयोजीत श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त पशु व पक्षी प्रदर्शनाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे,माजी संचालक डाॅ.अनिल भिकाणे, सहाय्यक आयुक्त डाॅ.कृष्णा पांडे, तालुका पशु संवर्धन अधिकारी डाॅ.विजय घोणसीकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, व्यंकट बोईनवाड, डाॅ.प्रफुल्ल पाटील, डाॅ. संजय धावारे, डाॅ.मत्सगंगा पाटील, राजश्री पाटील, डाॅ.सुर्यवंशी आर.व्ही., डाॅ.शिवकुमार पाटील, डाॅ.कपाळे विजयकुमार, डाॅ.पवनकर के.एन., डाॅ.उमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी मला शेतकऱ्यांच्या व पशुपालकांच्या कष्टाची जाणीव आहे. मी आमदार व लोकप्रतिनिधी या नात्याने पशुपालांकाच्या समस्या सोडविण्या साठी कटीबद्ध असल्याचे सांगून भविष्यात या पशु प्रदर्शनाचा प्रचार आणि प्रसार करुन या पशु प्रदर्शनाला भव्य स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पशुप्रर्दशानात आलेल्या पशुंची आ.संजय बनसोडे यांनी पाहणी करुन पशुपालकांशी चर्चा केली.
या पशु व पक्षी प्रदर्शनामध्ये लातूर, नांदेड जिल्ह्यातील अनेक पशु व पक्षी पालक आपले पशुपक्षी घेऊन सहभागी झाले होते. त्यात देवणी नर गट ८९, देवणी मादी गट ५६, लाल कंधारी नर गट ३९, लाल कंधारी मादी गट ५४, संकरित गाय गट २९, अश्व गट ६, शेळी गट १०, कुकुट गट १४ असे एकूण २९७ पशु व पक्षी प्रदर्शनात सहभागी झाले होते.
यावेळी शेतकरी, पशुपालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!