मोजे पिंपरी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न
उदगीर (एल पी उगिले) तालुक्यातील पिंपरी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान (कडधान्य) चे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोपान काकडे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शकांमध्ये श्रेयस यादव, उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर, संदीप वळकुंडे, तालुका कृषी अधिकारी उदगीर, डॉ. प्रफुल्ल पाटील, प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर, सौ. हर्षा गुंड, मंडळ कृषी अधिकारी उदगीर, खाजासाब थोडगे, प्रतिनिधी जिल्हा उद्योग केंद्र लातूर हे होते. मंचावर फारुख शेख, उप कृषी अधिकारी उदगीर, शिव शंकर पांडे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी पिंपरी, राजाराम राठोड, पोलीस पाटील पिंपरी यांची उपस्थिती होती. श्रेयश यादव, उप विभागीय कृषी अधिकारी यांनी नैसर्गिक शेतीकडे वळा, अन्नधान्यावर प्रक्रिया करून कसा जास्तीचा नफा मिळवता येतो व कृषी विभागाच्या विविध योजनां बद्दल मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी संदीप वाळकुंडे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग , गटशेती, महाडीबीटी, महाविस्तार एआय अँप बद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्राध्यापक डॉ. प्रफुल पाटील यांनी गो आधारित गोवंश संवर्धन, मुक्त गोठा पद्धत, दूध उत्पादन व प्रक्रिया या विषयावर सविस्तर माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी खाजा थोडगे यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी सौ हर्षा गुंड यांनी फळबाग लागवड व इतर मुख्य पिकांचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढते? याचे सूत्र सांगितले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा नितीन दुरुगकर यांनी नैसर्गिक शेती काळाची गरज व नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतावर कशा बनवायच्या व विषमुक्त शेती कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, नितीन दुरुगकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी मुरलीधर भंडे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सावली नैसर्गिक शेतकरी गटाचे अध्यक्ष रत्नाकर बिरादार, आत्म्याचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक संदिपान अंधारे, बाबुराव बिरादार, प्रकाश बिरादार, शिवाजी कपाळे, चंद्रभान नागरगोजे भरत खराबे, अंकुश नागरगोजे, विलास बिरादार, सुनील पटवारी, बजरंग घडले, बालाजी घडले, मुनीर जागीरदार, सुरेश राठोड, मुकेश केंद्रे, राम केंद्रे, प्रल्हाद नागरगोजे, मारुती नागरगोजे, गोविंद पाटील तसेच गटातील सदस्य, सचिव, शेतकरी मित्र यांनी पुढाकार घेतला.
