श्री गुरू हावगीस्वामी महाराज म्हणजे उदगीर शहराला लाभलेल एक वैभव : आ.संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगिले) : श्री गुरू हावगीस्वामी महाराजांच जीवन म्हणजे तळपत्या सूर्यासारखं तेजस्वी होतं त्यांच्या सदाचाराला,सदविचाराला आणि विवेकाला अंत नव्हता, एवढे असूनही सामान्य माणसाला सुंदर जीवन जगण्यासाठी सोपी जीवन पद्धती महाराजांनी सांगितली.
श्री गुरू हावगीस्वामी यात्रा महोत्सवा निमित्त आयोजीत परमरहस्य ग्रंथाचे पारायण व शिवनाम जपयज्ञ उदगीरचे वैभव असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते श्री सद्गुरु हावगीस्वामी यात्रा महोत्सव निमित्त सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंत्र जपयज्ञ अखंड शिवनाम सप्ताह व परम रहस्य पारायण समारोहाप्रसंगी बोलत होते.
यावेळी श्री श्री १०८ डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, सचिन हुडे, उमेश पाटील, बालाजी भोसले, वसंत पाटील, शिवकुमार हसरगुंडे, विजय निटुरे, मनोज कपाळे, राजकुमार हुडगे, नगरसेवक बाळासाहेब पाटोदे, गिरीष उप्परबावडे, बाळासाहेब मरलापल्ले, रामलिंग मठपती, शिवा उप्परबावडे, प्रमोद शेटकार, अनिरुध्द गुरुडे, भास्कर पाटील, कुणाल बागबंदे, ईश्वर समगे, शिल्पा उप्परबावडे, अनिता हैबतपुरे, रेखा कानमंदे, शंकुतला समगे, ताराबाई मोदे, सुरेखा समगे, श्रीदेवी खंदारे, शिवकुमार कांबळे, अंकेश धनुरे, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, शंकरप्पा हरकरे, वीरभद्र स्वामी, राजशेखर कानमंदे, अशोक समगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी, श्री गुरु हावगीस्वामी महाराजांनी इथल्या समाजाला धार्मिक वारसा मिळवून दिला. दया आणि कृपा ही महाराजांची देण आहे. ‘भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती आहे’ आणि ही भक्ती आम्हाला गुरुंनी शिकवली म्हणूनच आज या परिसरात भक्तीचा सुगंध पसरला असल्याचे आ. बनसोडे यांनी सांगितले.
मी गेल्या अनेक वर्षापासुन श्री गुरु हावगीस्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांचे आशिर्वाद घेतो इथे आले की समाजसेवेची नवी ऊर्जा मला मिळते. आपण सर्व माझ्या माता भगिनी व माझ्या बांधवांनी
माझ्यावर मोठा विश्वास दाखवून दुसऱ्यांदा मोठे मताधिक्य देवुन निवडून दिलात म्हणून मी ‘जे जे नव ते ते उदगीरला हवं’ या ब्रीद वाक्या प्रमाणे आपल्या उदगीरचा विकास केला आहे.
सर्वसामान्यांसाठी वीरशैव लिंगायत भवनची निर्मीती केली.
श्री गुरू हावगीस्वामी महाराज यांच्या मठाला दोन कोटी रुपयाचा निधी दिला. त्यातुन हा भव्य सभामंडप उभारले असुन येत्या काळात आणखीन निधी देणार असल्याचेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी उदगीर सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
