उदयगिरीची विद्यार्थिनी कासार समरीनला वक्तृत्व स्पर्धेत तृतीय

0
उदयगिरीची विद्यार्थिनी कासार समरीनला वक्तृत्व स्पर्धेत तृतीय

उदगीर (प्रतिनिधी): ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वसंतनगर (कोटग्याळ) येथील हिंदी विभागाच्या वतीने दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी ‘हिंदी भाषा में रोजगार के अवसर’ या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील एम.ए. हिंदी प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कासार समरीन चांदपाशा हिने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला.
कासार समरीनच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. बी.एस. भुकतरे, डॉ. रामकृष्ण बदने, डॉ. व्ही. पी. चनाळे, डॉ. पी. व्ही. काळे,प्रा. एस. एन. मुंजाळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!