हुडे संग्राम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आज सेवापूर्ती गौरव सोहळा
उदगीर (एल पी उगिले):
उदगीर शहरातील मौलाना आझाद मराठी प्राथमिक शाळेचे सहशिक्षक हुडे संग्राम विश्वाभंरराव यांनी तब्बल ३७ वर्षांची प्रदीर्घ व निष्ठावान सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारल्या बद्दल त्यांच्या सन्मानार्थ सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा गौरव सोहळा रविवार, ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता, कृष्णाई मंगल कार्यालय, नळेगाव रोड, उदगीर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी मंत्री व उदगीरचे लोकप्रिय आ. संजय बनसोडे तसेच संस्थेचे अध्यक्ष व अहमदपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार यांच्या हस्ते हुडे संग्राम विश्वाभंरराव यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूर-उल-हुदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नजीब जागीरदार हे राहणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे,
उदगीर नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा स्वाती सचिन हुडे,
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,जनकल्याण ग्रामविकास सेवा संस्था अहमदपूरचे सचिव शुकूर जागीरदार,पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी शेख शफी,
शिक्षण विस्तार अधिकारी शिवराज थोटे,शिक्षण विस्तार अधिकारी नितीन लोहकरे,केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष सय्यद जनिमियाँ,नगरसेवक राजकुमार हुडगे,तसेच अमरनाथ सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या गौरव सोहळ्यास शिक्षणप्रेमी नागरिकांनी, शिक्षक बांधवांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मौलाना आझाद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्ग यांनी केले आहे.
