मातृभूमी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात न्यायधिश डी बी मल्हाटकर यांचे मार्गदर्शन

0
मातृभूमी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात न्यायधिश डी बी मल्हाटकर यांचे मार्गदर्शन

उदगीर (एल पी उगिले) विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदवीचा उपयोग देश आणि, समाजहितासाठी करावे,असे प्रतिपादन न्यायधिश डी बी म्हलाटकर यांनी केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सलग्नित मातृभूमी महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते .
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे हे होते तर प्रमुख पाहुणे तहसीलदार राम बोरगावकर, स्वारातीम विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा मारोतीराव गायकवाड, धनंजय गुडसूरकर, प्राचार्य उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या बीसीए, बीसीएस च्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .पुढे बोलतांना न्या. म्हलाटकर म्हणाले.मातृभूमी महाविद्यालयात संगणक विषयातील पदवी शिक्षणासाठी ग्रामीण भागासह शहर भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असतात .आज सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यामुळे संगणक शिक्षणचा उपयोग सायबर गुन्हे कमी करण्यासाठी करावे. समाजात वावरताना तुम्ही कोणत्या क्षेत्रात जाता, यापेक्षा तुम्ही तिथे कसे वागता, याला अधिक महत्त्व आहे. कायदा केवळ न्यायालयात नसतो, तर तो आपल्या वर्तणुकीत आणि शिस्तीत असतो. तुम्ही उद्याचे वकील, डॉक्टर किंवा उद्योजक व्हाल, पण त्याआधी एक ‘न्यायप्रिय’ नागरिक व्हा.धनंजय गुडसूरकर म्हणाले साहित्यिक म्हणून मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो, तेव्हा मला तुमच्यात उद्याचे नायक आणि नायिका दिसतात.आयुष्य हे एका महाकाव्यासारखे आहे. इथपर्यंतचा प्रवास हा ‘पूर्वार्ध’ होता, आणि आता खऱ्या ‘उत्तरार्धा’ला सुरुवात होत आहे. तुमच्या आयुष्याची लेखणी तुमच्या स्वतःच्या हातात आहे. अपयशाची एखादी ओळ आली तरी घाबरून जाऊ नका, कारण तो तुमच्या संघर्षाचा एक भाग असेल. समाजात वावरताना इतरांच्या दुःखाचे शब्द व्हा, वंचितांचा आवाज व्हा. साहित्य आपल्याला हेच शिकवते की, दुसऱ्याच्या डोळ्यांतील पाणी पुसता येणे हेच सर्वात मोठे शिक्षण आहे.

यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी म्हणाले गेली काही वर्षे तुम्ही या मातृभूमी महाविद्यालयांमध्ये ज्ञानाची साधना केलीत. शिक्षकांनी तुम्हाला केवळ पुस्तके शिकवली नाहीत, तर आयुष्याच्या संघर्षासाठी तयार केले आहे. आज तुम्ही इथून बाहेर पडताना केवळ एक ‘डिग्री’ घेऊन जात नाही आहात, तर या समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी घेऊन जात आहात.
फहसीलदार राम बोरगावकर म्हणाले, पदवीधरांना एवढेच सांगेन की, तंत्रज्ञान बदलेल, जग बदलेल, पण तुमची मानवी मूल्ये कधीही बदलू देऊ नका. समाजासाठी, देशासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहा.
प्रा डाॅ मारोती गायकवाड म्हणाले बाहेरचे जग एका विशाल न्यायालयासारखे आहे, जिथे तुमचे चारित्र्य आणि तुमचे कर्तृत्व यांची रोज साक्ष घेतली जाईल. तिथे तुमची ‘पदवी’ तुम्हाला संधी मिळवून देईल, पण तुमचे ‘संस्कार’ तुम्हाला यश मिळवून देतील.
कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी केले तर सूत्रसंचालन स्वाती भांगे व जाई शर्मा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रणजीत मोरे, प्रा शितल पवार, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा शिवांगी वट्टमवार, काळे अस्विनी, नेहा वाघमारे, प्रा. काकरे प्रतीक्षा, ग्रंथपाल उषा सताळकर, रामकिशन भोसले, मादळे प्रदीप, दीपक रणदिवे, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयुर मुळे, संगीता दुडे, सय्यद सिमा, प्रकाश गायकवाड, जगदिशा ओंकारे, मुबारक पटेल,अर्चना बिरादार, गोल्डन गेट शाळेच्या प्राचार्या वनिता सुगंधी, अर्चना मठपती, यांच्यासह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!