अबॅकस क्लासेस मुळे गणित विषयामध्ये प्राविण्य मिळवता येते – डॉ. तेलगाने

0
अबॅकस क्लासेस मुळे गणित विषयामध्ये प्राविण्य मिळवता येते - डॉ. तेलगाने

उदगीर (एल पी उगिले) अबॅकस क्लासेस मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो, तसेच गणितामध्ये प्राविण्य मिळवता येते. असे विचार उदगीर येथील सुप्रसिद्ध ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे प्रमुख तथा प्रबोधनात्मक कीर्तनकार ह भ प डॉक्टर शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.
श्री मेट्रो ब्रेन अबॅकस क्लासेस चा राज्य स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
आनंद नगर,मोंढा रोड येथील श्री मेट्रो ब्रेन अबॅकस च्या संचालक सौ अश्विनी व्यंकटेश पेन्सलवार अथक प्रयत्नाने २५ विद्यार्थ्यांना राज्य स्तरीय पुरस्कार मिळाला.या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुरेन्द्र आकनगीरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शरदकुमार तेलगाने, हनुमंत शेळके, पाटील , सुनील लदाडे,अनुप पेन्सलवार,आकाश हजारे उपस्थित होते.मोठया संख्येने पालक आपल्या पाल्यांच कौतुक पहावयास उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शरद कुमार तेलगाने मार्गदर्शन करत होते.
उदयगीरी कापड मार्केट महिला मंडळ व रोकडे हनुमान भजनी महिला मंडळाच्या वतीने संचालिका सौ. अश्विनी व्यंकटेश पेन्सलवार यांचा त्यांच्या पतीसह सत्कार करुण पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . सुत्रसंचलन शिंदे सर यांनी केले तर आयोजन व आभारप्रदर्शन व्यंकटेश पेन्सलवार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!