शास्त्री प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.
उदगीर (एल पी उगिले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव केंद्रे व विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक माधव केंद्रे यांनी स्वामी विवेकानंद यांचे बालपण,त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व हिंदू धर्माच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच,राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण कशी केली? त्या शिवबाला मोगलांपासून आपल्या जनतेला खूप त्रास होतो आहे,त्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रेरणा दिली.शिवाजी महाराजांना लहानपणीच राम-कृष्णाच्या गोष्टी सांगून वाईटांचा नाश केला पाहिजे, असे सांगत.राजमाता म्हणून त्यांनी शिवबाला सतत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडून नियमित व्यायाम व वाचन करुन देशासाठी कार्य करा. तसेच,राजमाता जिजाऊ यांच्याकडून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी लहाणपणापासूनच शिवबाला राम-कृष्ण,थोर राजे महाराजे व महापुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांची जडणघडण केली.आपणही जास्तीत जास्त थोर पुरुषांच्या आत्मचरित्राचे वाचन करून देशासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. मंजुषा पेन्सलवार यांनी केले.
