बनशेळकी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

0
बनशेळकी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

उदगीर (प्रतिनिधी ) उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथे प्रति वर्षाप्रमाणे दि. 28जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताह दरम्यान काकडा आरती, श्री चे अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, श्री तुकोबा रायचे गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, हरिजगर ई दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
त्याच बरोबर 28 जानेवारी रोजी ह. भ. प. श्री देवराव महाराज हैबतपुरकर, 29जानेवारी रोजी ह. भ. प. श्री आत्माराम महाराज कुमठेकर, 30 जानेवारी रोजी ह. भ. प. श्री. भगवान हंडे महाराज पंढरपूर,31जानेवारी रोजी ह. भ. प. श्री. निवृत्ती महाराज नामदास पंढरपूर, 1 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. श्री. परमेश्वर महाराज औराळकर, 2 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. श्री. सांगय्याप्पा स्वामी कंटाळीकर, 3 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. श्री. गुरुराज महाराज देगलूरकर, त्याच बरोबर
4 फेब्रुवारी रोजी ह भ. प. श्री. संतोष महाराज श्रीडॊळे बनशेळकी यांचे कल्याचे किर्तन होणार आहे.
तरी या परिसरातील भावी भक्तानी या कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवहान ग्रामस्थ मंडळ बनशेळकी यानी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!