उदयगिरीत भूगोल दिन साजरा

उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भूगोल दिन व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. भूगोल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भूगोल सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे उपस्थित होते. प्रारंभी पृथ्वी गोलाचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. काळगापुरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भूगोल विषयातील करिअरच्या संधी व भविष्यातील आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. हल्लाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. एम. पी. मानकरी यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी सोनी कांबळे हिने केले, तर पाहुण्यांचा परिचय कुमारी रोहिणी कांबळे हिने करून दिला. बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. जे. कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. ए. यू. नागरगोजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. ए. के. वळवी, प्रा. प्रियंका रंगवाळ व संतोष चिघळीकर यांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!