चार गाव पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची उर्जा राज्यमंत्री मा.ना.श्री प्राजक्तजी तनपुरे यांच्याकडे ढोकी ग्रामपंचायतची मागणी
ढोकी (सागर वीर) : आज ढोकी येथील जावई आणि राज्याचे ऊर्जा, नगरविकास,तंत्रशिक्षण राज्यमंत्री मा.श्री. प्राजक्तजी तनपुरे हे ढोकी येथे आले असता, ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ढोकी, तेर, तडवळे व येडशी या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत तेरणा मध्यम प्रकल्पातून योजना सुरू आहे, परंतू ही योजना सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत राहिली आहे, थकीत वीजबिल, थकीत नळपट्टी, यामुळे काही कालावधीसाठी योजना बंदही राहिली, परंतु चारही ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ढोकीचे माजी उपसरपंच अमर समुद्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने ती पुन्हा कार्यान्वित झाली, दरम्यान योजना राबविण्यात नेहमीच कुठल्या ना कुठल्या अडचणी अडचणी येत असल्याने आता ही योजना विनाअडथळा कायम सुरू ठेवण्यासाठी येथील तेरणा मध्यम प्रकल्पावर सौरऊर्जा प्रकल्प लवकरात लवकर बसवून चार गावांची अडचण दूर करावी या मागणीचे निवेदन मा.मंत्री महोदयांना देण्यात आले व त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, यावेळी उपसरपंच अमोल (पापा) समुद्रे, गावचे उद्योजक श्री.सुभाषराव देशमुखसाहेब, माजी उपसरपंच अमर समुद्रे,पोलीस पाटील राहुल वाकुरे, आदर्श घोडके उपस्थित होते.