पिके तरारली. मात्र ओढे- नाल्यांमध्ये ठणठणाटच !
निफाड तालुक्याला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा
निफाड (आकाश शेटे) : तालुक्यातील गोदकाठला मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या थोड्याफार रिमझिम पावसामुळे पिके तात्पुरती तरारली आहेत. मात्र परिसरात अद्यापही मोठा पाऊस न पडल्याने ओढे-नाले, पाझर तलावांमध्ये ठणठणाटच आहे. त्यामुळे विहिरींची पातळी अद्याप खालावलेली असल्याने परिसरात जोरदार पावसाची गरज आहे. दरवर्षी जुलै महिन्यात निफाड तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतात मात्र या वर्षी पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेलं तरी नाले, ओहोळ कोरडे ठाक असल्याचे चित्र आहे. दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग असल्याने गोदावरी खळखळली असली तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
परिसरात खरिपाची पिके दुबार पेरणी करत एका महिन्याच्या विलंबाने सुरुवात झाली तर काही पिके करपायला लागली होती. मात्र रिमझिम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्याप मोठा पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. सद्या नाशिक जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पाऊस सुरू असला तरी निफाड, येवला, देवळा, नांदगाव, सटाणा, दिंडोरी या तालुक्याना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या शेतकऱ्यांनी पिकांच्या अंतर मशागतिचा वेग वाढविला आहे. शेतकरी निदणी व कोळपणी, खत पेरणी, औषध फवारणी इत्यादी कामे करताना दिसत आहेत. परिसरात खरिपाची पिके दुबार पेरणी करत एका महिन्याच्या विलंबाने सुरुवात झाली तर काही पिके करपायला लागली होती. मात्र रिमझिम पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्याप मोठा पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.