उदयगिरीत गुरु तेग बहादूर यांची जयंती उत्साहात साजरी

0
उदयगिरीत गुरु तेग बहादूर यांची जयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शिख धर्माचे नववे गुरु, धर्म, मानवता व सत्यासाठी बलिदान देणारे गुरु तेग बहादूर महाराज यांची जयंती भक्तिभावाने व आदरपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच संस्थेचे सदस्य अ‍ॅड. अजय दंडवते, शिवराज वल्लापुरे, नाथराव भंडे, प्रा. अडेप्पा अंजुरे, अ‍ॅड. रमाकांत अंकुलगे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!