राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये उदगीरच्या तीन सख्ख्या बहिणी चमकल्या

0
राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये उदगीरच्या तीन सख्ख्या बहिणी चमकल्या

उदगीर (एल पी उगिले) शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मलकापूर या गावच्या तीन सख्ख्या बहिणींनी राष्ट्रीय स्पर्धेचे मैदान गाजवले.
14 वर्षे वयोगटांमध्ये भारती पवार महाराष्ट्र संघाकडून सांघिक प्रकारात खेळत कास्य पदक प्राप्त केले .
17 वर्ष वयोगटांमध्ये जानवी पवार हिने महाराष्ट्र संघाकडून खेळत सांखिक प्रकारामध्ये रोप्य पदक प्राप्त केली आहे .
19 वर्ष वयोगटांमध्ये वैष्णवी पवार हिने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 648 गुण प्राप्त करून प्रथम स्थान पटकावले. सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक
आणि सांघिक स्पर्धेमध्येही सुवर्णपदक प्राप्त करून महाराष्ट्र राज्यसह आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे, आपल्या गावाचं नाव सुवर्णाक्षरात कोरले आहेत .या तीन पवार भगिनींनी आपली पावर दाखवून दिली आहे .
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानवी पवार इयत्ता दहावीत शिकत आहे. आणि वैष्णवी पवार इयत्ता बारावीत शिकत आहे.या बहिणींनी आपल्या शिक्षणासोबत खेळाला समतोल ठेवले आहे. खेळ आणि शिक्षण हे कशाप्रकारे घ्यावे, हे या तिघांच्या कृती मधून दिसून येते.

या तिघे बहिणी गुरुकुल स्पोर्ट क्लब मध्ये सुधीर पाटील, सुषमा पवार, मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहेत

हे यश पाहून जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे ,आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक रणजीत चामले, लातूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुनील साखरे ,सचिव अशोक जंगमे,राजकुमार देवकर ,हनुमंत केसरे, नवनाथ गरगटे ,क्रीडाप्रेमी भास्कर पाटील ,खलील खान पठाण,यमुनाजी भुजबळे ,जिलानी शेख ,शंकर जाधव ,रामेश्वर मोतीपोळी ,बालाजी केंद्रे .
यांनी या तिघांना कौतुक केले व शुभेच्छा दिल्या

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!