काँग्रेसचे विजयकुमार साबदे यांची मनपाच्या गटनेतेपदी नियुक्ती
लातूर : प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक विजयकुमार साबदे यांची लातूर शहर महानगरपालिकेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची वंचित वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ४३ जागांवर दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहूमत प्राप्त केले आहे. वंचित बहूजन आघाडीने ५ पैकी ४ जागा जिंकल्या. काँग्रेस वंचित बहूजन आघाडीने एकुण ४७जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेत काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीचीच सत्ता स्थापन होणार आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित
विलासराव देशमुख, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या गटनेतेपदी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विजयकुमार साबदे यांची निवड केली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक विजयकुमार साबदे यांची लातूर शहर महानगरपालिकेच्या गटनेतेपदी नियुक्त झाल्याचे विभागीय आयुक्तांनी जाहीर केले.
