निडेबन गावातून डॉ. दीपक सोमवंशी यांना विक्रमी मताधिक्य मिळेल – उपसरपंच फैयाज आत्तार

0
निडेबन गावातून डॉ. दीपक सोमवंशी यांना विक्रमी मताधिक्य मिळेल - उपसरपंच फैयाज आत्तार

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरालगत असलेल्या निडेबन जिल्हा परिषद मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी यांना प्रचंड मताधिक्य मिळेल. असा विश्वास निडेबन गावचे उपसरपंच फैयाज उर्फ पप्पू अत्तार यांनी व्यक्त केला आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून फय्याज उर्फ पप्पू आत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
निडेबन गावचे सुपुत्र तथा उच्च विद्या विभूषित समाजसेवक असलेले डॉ. दीपक सोमवंशी हे लोकांच्या मनामध्ये बसलेले व्यक्तिमत्व असल्याने अशा उच्चशिक्षित माणसाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजसेवा करता यावी. असा विचार ठेवून निडेबन गावातील लोक मतदान करतील आणि मोठ्या मताधिक्याने डॉ. दीपक सोमवंशी विजयी होतील. असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे तसेच निडेबन गावचे माजी सरपंच सुनील सोमवंशी यांच्यासह उदगीर शहरातील अनेक नगरसेवक तसेच जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी, निडेबन पंचायत समिती गणाचे उमेदवार विमलताई चिखले तसेच युवा नेते मनोज चिखले, प्रकाश राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना फैयाज उर्फ पप्पू अत्तार यांनी स्पष्ट केले की, गावातील एक विद्वान माणूस जिल्हा परिषदेवर निवडून येणे, ही काळाची गरज आहे. राजकारणामध्ये आज साम-दाम-दंड-भेद अशा पद्धतीच्या नीती वापरून राजकारण केले जात आहे. मात्र निडेबन गाव चांगली माणसे निवडायला शिकले आहे. त्यामुळे विकासाची जाण असलेले आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे डॉ. दीपक सोमवंशी निश्चितच प्रचंड बहुमताने विजयी होतील. असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!