मोटारसायकल चोरास उदगीर ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
मोटारसायकल चोरास उदगीर ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एका मोटारसायकल चोरास अटक करून 80 हजारांची दुचाकी आरोपींकडून हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन गुरुनाथ मिरजगावे (रा. विकास नगर उदगीर) यांची एम एच 24 AR 8385 या क्रमांकाची) होंडा युनिकाँन कंपनीची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी 17 डिसेंबर 2025 रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले होते. या पोलीस पथकातील पोलीस हवालदार राम बनसोडे, पोलीस हवालदार संदीप केंद्रे, पोलीस अंमलदार नामदेव चेवले, पोलीस अंमलदार राजकुमार डबेटवार, पोलीस अंमलदार सचिन नाडागुडे, राजकुमार देवडे,शैलेश सुडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी इरफान इस्माईल मणियार (वय 31 वर्ष राहणार नळगीर) यांना 26 जानेवारी रोजी बेड्या ठोकल्या. व त्यांच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!