मातृभूमीच्या वतीने रस्ते सुरक्षा जनजागृती,विद्यार्थ्यांनी साखळी करत केली जागृती

0
मातृभूमीच्या वतीने रस्ते सुरक्षा जनजागृती,विद्यार्थ्यांनी साखळी करत केली जागृती

उदगीर (एल पी उगिले)
मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी, नागरिकांमध्ये सुरक्षित व जबाबदार वर्तनाची जाणीव निर्माण करुन देऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी, मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मानवी साखळी करत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी कार्यालयसमोरील मुख्य रस्त्यावर मातृभूमी महाविद्यालयाचे बिसीएसच्या विद्यार्थ्यांनी फलकाच्या माध्यमातून वेगमर्यादेचे उल्लंघन,मद्यपान करून वाहन चालवू नका,मोबाईल वापरत वाहन न चालवणे,हेल्मेट व सीट बेल्ट वापरा, पादचार्‍यांचा आदर करणे, असे विविध संदेश देणारे फलकाच्या माध्यमातून रस्ते वाहातूक सुरक्षा जागृती करण्यात आली. प्राचार्य उषा कुलकणी,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा बिभीषण मद्देवाड यांची उपस्थिती होती ,यशस्वितेसाठी प्रा उस्ताद सय्यद, प्रा.मोरे रंजीत प्रा,अन्वेश हिप्पळगावकर,प्रा . शिवांगी वट्टमवार , प्रा जाई शर्मा, प्रा दीक्षा स्वामी ,पाटील मीरा ,प्रतीक्षा काकडे, नेहा वाघमारे, राहुल जाधव, उषा सताळकर, जगदीशा ओंकारे, प्रदीप मादळे, काळे अश्विनी, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयूर मुळे, प्रकाश गायकवाड, मुबारक पटेल आदिंनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!