साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांना भाग्यविधाता राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार जाहीर
उदगीर (एल पी उगिले) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांना नाशिक येथील भाग्यविधाता राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर झाला. तसे निवडीचे पत्र संचालक बी. सुदर्शन यांचे, अविनाश कदम यांच्याकडून त्यांना प्राप्त झाले.त्यांनी केलेल्या शैक्षणिक, साहित्यिक, समीक्षक आणि संपादनातील उत्कृष्टतेची दखल घेत त्यांना शिक्षण आणि युवा मार्गदर्शन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.ते मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य,मुंबई , मसाप संभाजीनगर, तिफण त्रैमासिक संभाजीनगरचे सदस्य आहेत.उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथील एम ए च्या अभ्यासक्रमात त्यांच्या दोन संपादित पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड झालेली आहे.ते पीएच.डीचे संशोधन मार्गदर्शक आहेत. त्यांचे 20 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.त्यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या 30 पेक्षा जास्त पुस्तकांना प्रस्तावना दिल्या तर महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या 15 पेक्षा जास्त पुस्तकांना ब्लर्बलेखन दिलेले आहे.महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त साहित्यिकांच्या पुस्तकांवर विविध वर्तमानपत्रातून समीक्षा प्रकाशित झाल्या व प्रत्येक आठवड्याला प्रकाशित होत आहेत.विविध वांङ्मयीन नियतकालिकांतून, मासिकांतून 60 पेक्षा जास्त लेख प्रकाशित, 30 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, सदस्य ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे,काकासाहेब पाटील, भिमराव पाटील तसेच पृथ्वीराज पाटील, पुंडलिकराव पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम.मांजरे,पत्रकार बांधव, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार, नातलग यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
