कौडगावे गणपत यांचासेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न
उदगीर (एल पी उगिले) :सुकणी गावचे सुपुत्र प्राचार्य गणपत व्यंकटराव कौडगावे हे दयानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हाडोळती ता.अहमदपूर जि.लातूर या शाळेत ते प्राचार्य पदावरून प्रदिर्घ शिक्षण क्षेत्रात सेवा केली.व 31 जानेवारी 2026 रोजी या सेवेनंतर ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
आजपर्यंतच्या आपल्या कार्यकाळात निष्ठेने व मेहनतीने कर्तव्य पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे.शाळा व प्रशासन यामध्ये योग्य तो समन्वय साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे प्राप्त करून देता येईल? यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे.सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सेवा पूर्तीच्या नंतरचा काळ हा आरोग्यदायी आणि मनाला आनंद देणारा ठरो. अशा पद्धतीच्या भावना उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार केल्यानंतर बोलताना व्यक्त केल्या.
