डॉ. दीपक सोमवंशी यांचा झंजावाती दौरा, गावागावातून त्यांचा सत्कार आणि स्वागत
उदगीर (एल पी उगिले) उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील समाजसेवक तथा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉ. दीपक सोमवंशी यांच्या प्रचारादरम्यान मतदान संघातील प्रत्येक गावातून त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार आणि त्यांची आरती करण्याचा प्रकार दिसल्यामुळे डॉ. दीपक सोमवंशी हे लातूर जिल्ह्यातील प्रचंड मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरतील, अशा पद्धतीचा विश्वास या जिल्हा परिषद सर्कल मधून व्यक्त करण्यात येत आहे.
एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस, गोरगरिबाचा मसीहा म्हणून ज्याची ओळख आहे, आणि ज्याने हजारो महिलांच्या बाळंतपणासाठी स्वखर्चाने त्यांच्यासाठी खर्च करून जीवन वाचवले आहे. अशा आरोग्य दूताचा हा गौरव ठरणार आहे. असा विचार जनतेतून व्यक्त होत आहे. डॉक्टर दीपक सोमवंशी म्हणजे गोरगरिबांचा मसीहा अशी ओळख झालेली आहे. त्यामुळे गोरगरिबांना त्यांच्याबद्दल प्रचंड जवळीकता आहे. अशा सामाजिक जाणीव जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे, असा निर्णय माळेवाडी आणि मादलापूरच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. अनेक ठिकाणी गाठीभेटीच्या दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच मनोज चिखले आणि डॉ. दीपक सोमवंशी यांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर सर्व नागरिक डॉक्टर दीपक सोमवंशी आणि मनोज चिखले यांच्या सोबत असल्याचे चर्चिले जात आहे.
