उदयगिरीत लातूर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात संपन्न

0
उदयगिरीत लातूर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात संपन्न

उदगीर (एल पी उगिले) लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्कूल कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत वार्षिक सब ज्युनिअर मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळेतील वयोगटानुसार 8, 10, 12 व 14 वर्षाखालील मुले- 193 व मुली- 126 एकूण- 319 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. खेळाडूंच्या प्रवेशासाठी ऑनलाइन आणि स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने नोंदणी घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेते खेळाडू कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेच्या आयोजना साठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने 32 पंचांनी तर 28 स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष बसवराज पाटील मलकापूरकर, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष माधवराव नौबदे, संघटनेचे सहसचिव निजाम शेख, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. सचिन चामले, क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे हे उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी सामाजिक बांधिलकी दाखवत प्रायोजकत्व स्वीकारून डॉ. महेशकुमार जाधव – गंगाई बाल रुग्णालय उदगीर, दीपक केंद्रे – केंद्रे वॉटर प्लांट उदगीर, सत्यजित गायकवाड – गायत्री स्पोर्ट्स लातूर, रवी कांबळे – ए. के. स्पोर्ट्स उदगीर, बी. के. कांबळे – ग्रामपंचायत अधिकारी, विश्वनाथ पाटील गणेश ॲग्रो एजन्सीज उदगीर, सूर्यकांत मुक्कावार – उद्योगपती, उदगीर यांनी विशेष हातभार लावला आहे. पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी प्रायोजक व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रायोजकांच्या सहकार्यामुळे सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मदत झाली.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव ॲड. विक्रम संकाये, कार्याध्यक्ष प्रा.व्ही.आर.हुडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत पंच म्हणून प्रा. डॉ. सचिन चामले, प्रा. डी. आर. मुंढे, संतोष कोले, प्रा. रमजू शेख, लक्ष्मण सोनकांबळे, प्रा.सचिन चौधरी, राहुल होनसांगळे, मंडले अंकुश, सुनील तारे, रमेश सूर्यवंशी, साईनाथ कांबळे, मारुती बिरादार, जनक घोगरे,अमर सूर्यवंशी, मिथुन शिंदे, अरविंद पांचाळ यांनी कामे पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव जेवळीकर तर आभार क्रीडा संचालक प्रा. सतिश मुंढे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!