राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत उदयगिरीचा संघ प्रथम
उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वादविवाद संघ शहीद बालाजी माले आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत प्रथम आला आहे. शिवाजी महाविद्यालय, रेणापूर यांच्यावतीने आयोजित ‘सरकारचे मोफत धोरण योग्य / अयोग्य’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेत उदयगिरीच्या सायली उमाकांत कुलकर्णी व आनंद काशिनाथ बोडके या विद्यार्थ्यांनी सांघिक प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ढाल व सन्मानपत्र तसेच सायली उमाकांत कुलकर्णी या विद्यार्थिनीला वैयक्तिक प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये रोख व सन्मानपत्र प्राप्त झाले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष माधवराव नौबदे, संस्था सदस्य शिवराज वल्लापुरे व सर्व संस्था सदस्य तसेच प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, प्रा. एस. जी. कोडचे, वादविवाद समिती प्रमुख डॉ. बी. एस. भुक्तरे, मार्गदर्शक डॉ. जी. जी. जेवळीकर, डॉ.आर. बी. आलापूरे, डॉ. व्ही. एस. नागपूर्णे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
