ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत जुगारावर छापा, गुन्हा दाखल

0
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत जुगारावर छापा, गुन्हा दाखल

उदगीर प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील कौलखेड मार्गावरील शहरापासून जवळच असलेल्या लाईफ केअर हॉस्पिटल च्या समोर एका रूम मध्ये अवैध धंदे चालू असल्याची माहिती पोलिसांना लागली होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 37 हजार 300 रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी साईनाथ भैरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजित श्रीधर राठोड (रा. मुक्ताईनगर, आप्पाराव चौक, हाल मुक्काम बोरतळ तांडा तालुका उदगीर), धनराज सुदाम गायकवाड (राहणार क्रांतीनगर निळेपण तालुका उदगीर), पवन सत्यनारायण गिल्डा (राहणार नाईक चौक उदगीर तालुका उदगीर), लहू रामराव जाधव (राहणार बोरतळ तांडा तालुका उदगीर), गणेश रामचंद्र वाघमारे (राहणार नइ आबादी उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील लाईफ केअर हॉस्पिटल च्या समोर शिवाजीनगर येथे एका रूम मध्ये तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आलेल्या लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून त्यांच्याजवळ जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस ग्रामीण पोलीस करत आहेत.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असल्याची ओरड सध्या चालू आहे. पोलीस प्रशासन चमकोगिरी करत असल्याचा आरोपही लोक करू लागले आहेत. शहरातील चौका चौकात मटका आणि गुटख्याच्या अड्डे सुरू असून अवैध धंद्याने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कितीही आदर्शवादाच्या गप्पा मारत असले तरी प्रत्यक्षात मात्र लातूर जिल्ह्यात उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे चालू आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!