सर्वसामान्य नागरिक काँग्रेसच्या पाठीशी – नागोराव चिमनदरे

0
सर्वसामान्य नागरिक काँग्रेसच्या पाठीशी - नागोराव चिमनदरे

उदगीर (प्रतिनिधी)
वाढवणा जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वसामान्य मतदार, गोरगरीब जनता स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आणि या जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामे खेचून आणणारे युवा नेतृत्व कल्याण पाटील यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून, काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे विचार हंडरगुळी गावचे माजी सरपंच तथा वाढवणा जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नागोराव चिमनदरे यांनी व्यक्त केले आहेत.
काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी लोकनेते आ. अमित विलासराव देशमुख हे स्वतः मेहनत घेत आहेत. काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते आपल्या पाठीशी असून त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी केलेल्या विकास कामामुळे आपल्याला बळ मिळत असल्याचा विश्वासही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
आपण प्रत्यक्ष स्थानिक चा विकास केलेला आहे. गावचा आणि परिसरातला माणूस म्हणून लोक आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. परक्या उमेदवारापेक्षा स्थानिक चा उमेदवार कधीही चांगला, या विचाराने जनता काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे. वाढवणा जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. यात तीळ मात्र शंका नाही. अशीही खात्री याप्रसंगी नागोराव चिमनदरे यांनी व्यक्त केली आहे.
हंडरगुळी गावात नागरी सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले. त्यावेळेस देखील नेत्यांनी आपल्याला सहकार्य केले आहे. कल्याण पाटील हे प्रदेशचे पदाधिकारी असून देखील ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे तिन्ही उमेदवार विजयी होणारच, अशा पद्धतीची ग्वाही मतदार देत आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून या भागातील जनतेच्या संपर्कात असल्यामुळे तसेच त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेला असल्यामुळे जनता निश्चितपणे मला मताधिक्य देईल, असा विश्वास आहे. जनतेच्या सुखदुःखात मी सहभागी होतो, माझ्या सुखदुःखात ही जनता सहभागी राहील, आज मला जनतेची गरज आहे. ही गोष्ट जनता ओळखते. जेव्हा जेव्हा आमच्या परिसरातील निवडणुका असतील त्या त्या वेळेस माझ्या परिसरातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. आणि आजही त्याच विश्वासाने मला खात्री आहे, जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, आणि मला विक्रमी मताधिक्य देईल. असाही विश्वास नागोराव चिमुंदरे यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!