राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत श्री पांडुरंग विद्यालयाच्या संघास द्वितीय क्रमांक

0
राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत श्री पांडुरंग विद्यालयाच्या संघास द्वितीय क्रमांक

उदगीर (एल पी उगिले)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धा 2025-26 ही स्पर्धा महात्मा फुले सभागृह, एस सी ई आर टी पुणे येथे उत्साहात पार पडली. ही स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कलात्मक अभिव्यक्ती व विषयाधारित अध्ययनाला चालना देणे, तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कला-आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून एकूण 843 शिक्षकांनी ऑनलाइन लिंकद्वारे सहभाग नोंदविला होता. त्यामधून प्राथमिक निवड प्रक्रियेद्वारे 24 शिक्षकांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. निवड झालेल्या शिक्षक – विद्यार्थ्यांची अंतिम स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत उपक्रमशील शिक्षक नादरगे चंद्रदीप बालाजी, श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर, ता. उदगीर, जि. लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या संघाने सहभाग नोंदविला. त्यात कुंडगीर प्रशांत श्रीराम, बिरादार मदन देविदास, मेकलेवाड आर्यन रामलिंग, सुरनर पवन गोपाळ, रेगाटे अजिंक्य विकास, घटकार व्यंकटेश श्रीकांत या विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास विषयातील “पर्यावरणाचे संतुलन” या घटकावर आधारित सजीव, निर्जीव घटक व अन्नसाखळी या संकल्पनांवर नादरगे चंद्रदीप यांनी प्रभावी आणि कलात्मक सादरीकरण केले. विषयाची अचूक मांडणी, सर्जनशीलता व सादरीकरण कौशल्य यांच्या जोरावर या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सहाय्यक शिक्षक भोळे राजेंद्र उपस्थित होते.श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर तसेच उदगीर तालुक्याचे नाव राज्यस्तरावर गौरवास्पद ठरले असून या उल्लेखनीय यशामुळे राहुल रेखावार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे चे संचालक, डॉ.कमलादेवी आवटे सहसंचालक, श्री अरुण जाधव उपसंचालक, संघप्रिया वाघमारे, शीतल शिंदे, डायट प्राचार्य मारोती सलगर, अधिव्याख्याता अनिल जाधव, गटशिक्षणाधिकारी शेख , केंद्रप्रमुख राघोबा घंटेवाड, संस्थेचे सचिव विनायकर बेंबडे , विद्यालयाचे मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. तसेच सर्व शिक्षक वृंद , विद्यार्थी व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!