शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी शिवाजी भोळे यांची निवड

0
शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी शिवाजी भोळे यांची निवड

उदगीर (एल पी उगिले) शिवसेनेच्या उदगीर तालुकाप्रमुख पदी ज्येष्ठ शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव भोळे रावणगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
या निवडी प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक माजी आमदार सुधाकर भालेराव तसेच जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल , डॉक्टर सेलचे राज्य उपाध्यक्ष डॉ. तानाजी चंदावार, शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजी भोळे दावणगावकर हे अनेक वर्षापासून हिंदुत्ववादी विचारधारेसाठी निष्ठेने कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्य तत्परतेचा लाभ तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी व तालुक्यातील शिवसेना संघटन वाढीसाठी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या निवडीच्या अनुषंगाने शिवाजी भोळे यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना शिवाजीराव भोळे यांनी स्पष्ट केले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून शिवसेनेचे संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करत राहीन, शिवसेनेचा मान आणि सन्मान वाढीसाठीच कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण होईल, या दृष्टीने काम करीन. नेतृत्वाला कुठेही मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीचे काम माझ्या हातून होणार नाही. असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच ज्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन. असेही आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!