रामभाऊ तिरुके हे आरोग्य दूत, त्यांनी हजारोंचे जीव वाचवले – प्रा. मनीषा मुंडकर

0
रामभाऊ तिरुके हे आरोग्य दूत, त्यांनी हजारोंचे जीव वाचवले - प्रा. मनीषा मुंडकर

उदगीर (प्रतिनिधी) मराठवाड्याचे आरोग्य दूत म्हणून हजारो लोकांचे जीव वाचवणारे रामभाऊ तिरुके हे कर्म धर्म संयोगाने वाढवणा जिल्हा परिषद सर्कल मध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे खरे तर आपल्या परिसरातील जनतेचे सौभाग्य समजावे. कारण जात, धर्म, पंथ या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लातूर जिल्ह्यातील गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आणि विशेषतः कोणत्याही गोरगरिबाच्या घरातील सुखदुःख जाणून घेऊन त्यांच्यामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ तिरुके आहेत. माझे सौभाग्य आहे की, माझ्यासोबत वाढवणा जिल्हा परिषद सर्कलचे ते उमेदवार आहेत. मी वाढवणा पंचायत समिती गणाची उमेदवार आहे. ते जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. रामभाऊ तिरुके यांचे व्यक्तिमत्व फार मोठे आहे. आज पर्यंत त्यांनी लातूर जिल्ह्यातील किमान एक लाख लोकांना शासनाच्या आरोग्यदायी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. हा लाभ मिळवून देताना ते स्वखर्चाने मुंबईपर्यंत रुग्णांना घेऊन जात होते, कित्येकांच्या आरोग्याचे उपचारही त्यांनी केलेले आहेत. शासनाच्या योजनेसोबतच त्या रुग्णांच्या नातेवाईकांचा, रुग्णाचा खर्च हे देखील रामभाऊंनी आजपर्यंत केलेला आहे. अशा पद्धतीचा आरोग्य दूत मी पाहिलेला नव्हता. मात्र गावोगावातून गंभीर स्वरूपाच्या आजाराचे पाच-दहा तरी रुग्ण रामभाऊ तिरुके यांनी शासनाच्या योजनेचा लाभ देऊन दुरुस्त केलेले आहेत. हे मी आज अनुभवते. असे विचार वाढवणा पंचायत समितीच्या उमेदवार प्रा. मनीषा मुंडकर यांनी व्यक्त केले आहेत.
वाढवणा जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून रामभाऊ तिरुके यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजसेवेला प्राधान्य देऊन तत्कालीन समाजसेवक तथा भाजपचे जेष्ठ नेते नागनाथ अण्णा निडवदे यांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असतानाच भारतीय जनता पक्षाची ही मूर्तमेढ रोवण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांचे हे फार मोठे योगदान कित्येकांना माहित नाही. मात्र रामभाऊ तिरुके म्हणजे गोरगरिबाचा कैवारी, गोरगरिबाच्या घरातील आजारी माणसाचा देवदूत म्हणून लोक ओळखतात. आम्हाला माहिती आहे, आमच्या परिचयातल्या अनेक लोकांना रामभाऊंनी मुंबईपर्यंत स्वखर्चाने घेऊन जाऊन त्यांना शासनाच्या आरोग्यदायी योजना मिळवून दिल्या आहेत. अशा देव माणसाला काही विकृत बुद्धीचे लोक टीका करत आहेत. हे अत्यंत विकृत बुद्धीचे राजकारण काही लोक करत आहेत, सुज्ञ मतदार अशा विकृत लोकांना योग्य जागा दाखवतील. राजकारण म्हटल्यानंतर टीकाटिप्पणी होत राहते, परंतु दुर्दैवाने सूर्यावर थुंकण्याची विकृत प्रवृत्ती काही लोकांची निर्माण झाली आहे. हे अत्यंत खजील होऊन सांगावे लागत आहे.
या देशांमध्ये देवालाही अग्नी परीक्षा द्यावी लागत होती, तीच अवस्था रामभाऊ यांच्या संदर्भामध्ये निर्माण होत आहे की काय? असा प्रश्न मला पडत आहे. असे विचार भाजपच्या नेत्या तथा वाढवणा पंचायत समितीच्या उमेदवार प्रा. मनीषा मुंडकर यांनी व्यक्त केले आहेत.

ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचला आहे. त्या माणसावर टीका करणे म्हणजे हास्यास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या. जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात रामभाऊ तिरके यांचा प्रभाव आहे. जो माणूस सर्वसामान्य माणसाचे सुखदुःख ओळखतो, त्या माणसासोबत आम्ही आहोत. हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. अशा पद्धतीचे विचार मतदार संघातील सर्वसामान्य माणूस बोलून दाखवत आहे. असे विचार मनीषा मुंडकर यांनी व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!