उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस उप महानिरीक्षकाच्या विशेष पथकाच्या धाडी
उदगीर (एल पी उगीले) पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाने लातूर जिल्ह्यामधील काही पोलीस स्टेशन मधील जुगार अड्डयांवर छापे अग्नीशस्त्रासह साडेतीन लाख रुपयांची रोकड, 27 मोबाईलसह जुगार साहित्य जप्त केले आहे. आपल्या नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर व इतवारा भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे पथक पाठविले होते, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड व इतर पाच अंमलदारांचा समावेश असलेल्या सदर पथकाने लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक चौकातील रमेश गिरी याच्या जुगार अड्डयावर कारवाई करत, नगदी रुपये 1,05,200/- व 70 हजार रुपयांचे (12) मोबाईल असा एकूण 1,75,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमूद प्रकरणात तेरा आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं क्र. 41/26 कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एका अड्ड्यावर जरी धाड पडली असली तरी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणखी अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे चालू आहेत. तसेच मटक्याच्या बुक्यां गल्लोगल्ली थाटलेले आहेत. अवैध धंद्यांनी उदगीर ग्रामीण हत्ती मध्ये कहर केला आहे. वाढवणा हद्दीतील मटका किंग मुळे उदगीर शहरामध्ये मटक्याचा अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
