कलश मिरवणूकीने परमरहस्य ग्रंथ पारायणाची सांगता

0
कलश मिरवणूकीने परमरहस्य ग्रंथ पारायणाची सांगता

उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील मलकापूर येथील एसटी कॉलनी मध्ये शिवलिंग,नंदी व कळशारोहण सोहळ्यानिमित्य आयोजित परमरहस्य ग्रंथ पारायणाची भव्य शोभा यात्रेने सागंता झाली.
एस.टी.काॅलनी नविन वसाहत मलकापूर येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग व नंदी प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा निमित्य ग्रंथराज परमरहस्य ग्रंथ पारायणाची सुरुवात झाली. गूरुवार दि. 5 जानेवारी रोजी पारायणास बसलेल्या महिला सुवासिनींनी डोक्यावर कलश घेऊन व सजवलेल्या वाहनात ओंकारेश्वर मंदिर कळशाची पाऊले खेळत ,गूरु राज माऊली चा गजर करत फुगडी खेळत भव्य शोभा यात्रा ओंकारेश्वर मंदिर ते राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज चौक नळेगाव रोड, उड्डाण पुल मार्गे संपन्न झाली.यावेळी टाळआरतीचे किर्तन शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर यांचे संपन्न झाले. यावेळी शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांचे हस्ते ओंकारेश्वर मंदिर उरण्यासाठी केलला संकल्प सोडला. आशीर्वचनात शिवानंद शिवाचार्य महाराज यांनी गुरु भक्तीचे महत्व विशद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!