जि प च्या अध्यक्षपदाचे वांदे सुरू !लातूर जिल्हा परिषदेच्या विकासासाठी महायुतीची बैठक

0
जि प च्या अध्यक्षपदाचे वांदे सुरू !लातूर जिल्हा परिषदेच्या विकासासाठी महायुतीची बैठक

लातूर (एल पी उगीले) येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक यशस्वीपणे पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीस उपस्थित राहून जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देणे तसेच लवकरात लवकर महायुतीचे सत्ता स्थापन करण्याबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
लातूरच्या सर्वांगीण विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी महायुती कटिबद्ध असून, जनतेने दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत आहोत.
या बैठकीला राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी मंत्री व आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आ. संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, आ. अभिमन्यू पवार, तसेच अरविंद पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!