बनशेळकी येथे अंखंड हरीनाम सप्ताहानिमित्त गुणवन्त विद्यार्थीचे व कर्मचारांचे गौरव
उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील बनशेळकी येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने गावातील गुणवन्त विद्यार्थ्यांचे व कर्मचारी गावातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्याचा अखंड हरिनाम सप्ताह च्या वतीने गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील व व्यंकटराव देशमुख विद्यालय पाचवी ते दहावी वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर गावात उत्कृष्ट अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवक नागनाथ सूर्यवंशी,तलाठी गोपाळ बिरादार आरोग्य अधिकारी डॉ.अंतेश्वर हवांना, विद्युत अधिकारी केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गावातील धार्मिक क्षेत्रात काम केल्याबदल शि.भ.पा.महादेव स्वामी,शि.भ.पा. लक्मीबाई श्रीमंडळे,
ह. भ. पा. कस्तुरबाई चव्हाण आणि श्रीराम प्रतिष्ठानचे सतीश पाटील, कलप्पा स्वामी, अविनाश जाधव ,सुपारे व समाजसेवक सतीश पाटील मानकीकर यांच्चा सत्कार करण्यात आला.संपूर्ण सप्ताह सतीश महाराज मचकुरे आणि संतोष महाराज श्रीडॊळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, काल्याचे अन्नदान रावसाहेव सूर्यवंशी यांनी केले, तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीचाही गौरव करण्यात आला.सप्ताह निमित्य नांदेड मर्चंट बँकेतर्फे मोफत बचत खाते काढून देण्यात आले. या वेळी बँकेचे व्यवस्थापक संतोष जवादवार उपस्थित होते.यावेळी नागेश आंबेगावे, चेअरमन प्रल्हाद महाजन,उमाकांत श्रीडोळे, नामदेव सावळे,शिवलिंग भेदे,महादेव बिरादार,सारंग लोहारे, संकेत बिरादार, महादेव हाडोळे, ओम बिरादार, उमाकांत सूर्यवंशी, गुरुनाथ आंबेगावे, संदीप लोहारे,विनायक श्रीडोळे,बालाजी मजकुरे,महादेव पाटील, उमाकांत लोहारे, मनोज स्वामी,सूर्यकांत श्रीमंडले, विनायक आंबेगावे,बाळू चव्हाण या वेळी उपस्थित होते. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साप्ताहचे अध्यक्ष नागेश आंबेगावे यांनी केले, व आभार सप्ताहाचे उपाध्यक्ष मनोहर लोहारे यांनी केले.
