मनपा प्रशासनाच्या भूमिकेने शहरवासियांत घबराट

मनपा प्रशासनाच्या भूमिकेने शहरवासियांत घबराट

बेकायदा बांधकामे नियमितीकरणात सुसूत्रता हवी : अशोक गोविंदपूरकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर महामंगरपालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे नियमितीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेने सर्वसामान्य शहरवासियांत घबराट निर्माण झाली असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी महापौरांना एक निवेदन देऊन याकामी सुसूत्रता साधली जावी अशी मागणी केल्याची माहिती स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. महापौरांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मनपा प्रशासनाने सध्या शहरातील मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधलेल्या इमारतीचे नियमितीकरण करण्यासाठी आदेश काढले आहेत. त्याबाबत नागरिकात तीव्र नाराजीचा सूर आहे. बेकायदा बांधकाम नियमित होण्यास आमचा विरोध नाही. पण प्रशासनाने सुरु केलेल्या चुकीच्या पद्धतीस विरोध आहे. नागरीकातून होणार विरोध हा रेडीरेकनरच्या दराबाबत आहे. त्यावरच बांधकाम परवाना फीस व प्रिमियम रेट अवलंबून आहेत. त्यामध्ये फार मोठी तफावत असून त्यासाठी प्रत्येकाच्या जागेचे मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेऊन प्रकरण सुरु केल्यास नागरिकांतील रोष कांहीसा कमी होईल. कोणत्या वर्षाच्या पुढील इमारती ह्या बेकायदा ठरवाव्यात, हे एकदा कट ऑफ इअर ठरवावे व त्यापुढील बांधकामाची चौकशी करावी. शासनाच्या नवीन बांधकाम नियमावलीप्रमाणे रोडच्या रुंदीवर एफएसआय ठरत आहे. तो तीन पट होऊ शकतो. त्यासाठी रोड रुंदीचा चार्ट तयार करावा. प्रशासनाने दोन पटीपेक्षा जास्त एफएसआय दिलेला नाही. म्हणून अनेक इमारती बेकायदा ठरत आहेत, हा चार्ट मनपाकडे आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे नुकतेच कर मूल्यांकन करताना प्रत्यक्ष मोजमाप घेतले आहे. त्यावर नागरिकांनी कर भरणा केला आहे. तो नकाशा मनपाकडे असून तो ग्राह्य धरल्यास पुन्हा मोजमाप करण्याची आवश्यकता पडणार नाही. प्रशासनाची सर्वात मोठी चूक हे आहे की, प्रत्यक्ष बांधलेली सध्याची इमारत पूर्णतः बेकायदा ठरवत दर आकाराला जात आहे. त्याऐवजी पूर्वी मनपाने दिलेल्या बांधकाम परवानगीचा एफएसआय हा सध्याच्या बांधकामातून वजा करून उर्वरित किती स्क्वेअर फूट बेकायदा बांधकाम होते तेवढाच एफएसआय नियमितीकरणाची प्रक्रिया करावी, म्हणजे लोकांना आकडे भरमसाठ वाटणार नाहीत. नागरिकांना तूर्तास स्वयं निर्धारण तत्वावर कागदपत्रांसह प्रकरण दाखल करण्यासाठी सहा महिन्याची मुदत द्यावी. त्याची पुढील काळात कार्यवाही करून विद्यमान दराने नियमितीकरण करावे व त्या मुदतीनंतर जी प्रकरणे येतील किंवा मनपा कर्मचारी शोधून काढतील त्यांना ह्याच दराने दुपटीने फक्त फीस घेऊन नियमाप्रमाणे युडीसीआर च्या दराप्रमाणे प्रीमियम घेऊन प्रकरण निकाली काढण्यात यावे. जेणेकरून नागरिकात घबराट निर्माण होणार नाही व मनपाच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकेल, असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर अशोक गोविंदपूरकर यांसह अहमदखान पठाण, विजयकुमार साबदे , रविशंकर जाधव, इम्रान सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!